Share

चित्रा वाघ यांनी केले संजय राऊतांचे कौतुक, म्हणाल्या… त्यासाठी केंद्राला जबाबदार धरले नाही!

Published On: 

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. त्यातच काही भागात दरड कोसळल्यामुळे अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळे भाजपच्या वतीने सत्ताधारी शिवसेनेवर टीका करण्यात येत आहे. असे असताना मुंबईत दरड कोसळून मृत झालेल्या व्यक्तींसाठी संजय राऊत यांनी केंद्र सरकारला जबाबदार धरले नाही, यामुळे त्यांचे कौतूक करावे लागणार असल्याचे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

या संदर्भात चित्रा वाघ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संजय राऊत यांच्यावर टीका केलीय. त्या म्हणाल्या की, ‘संजयजी राऊत यांचं कौतुक करावं तेवढं कमीच, कारण त्यांनी पावसामुळे दरडी कोसळून मृत पावलेल्या मुंबईकरांसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरलं नाही.. पण मुंबईत गेलेले एकूण ३० बळी ‘अनैसर्गिक पावसाने’ नाही तर अनैसर्गिक आघाडीच्या कृतीशुन्यतेमुळं गेलेत.’

मुंबई आणि परिसरात झालेल्या पावसामुळे मुंबईतील कोलमडलेली व्यवस्था पुन्हा एकदा समोर आलीय. मुंबईतील अनेक भागात नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. मुंबई महानगर पालिकेत शिवेसनेची सत्ता असल्यामुळे भाजपच्या वतीने शिवसेनेवर टीका करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!