Share

चित्रा ताईंचा नवरा स्वत: भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकला आहे; रुपाली चाकणकरांचा टोला

Published On: 

पुणे : अखेर अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांविरोधात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर झालेल्या सुनावणी दरम्यान त्यांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे नैतिकतेचे भान राखून राजीनामा देण्याची तयारी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली होती.

परंतु आता महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला. पण आता प्रश्न उरतो की, नवा वसुली मंत्री कोण?, असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. मंत्रिमंडळातील एखादा चेहरा बदलल्याने महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्ट हेतू काही बदलणार नाही, अशी टीका देखील चित्रा वाघ यांनी केली आहे. त्यानंतर, रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर पलटवार केला आहे. ताईचा नवरा स्वत: भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी असून त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल आहे आणि ताई विचारत आहेत, नवीन वसुली मंत्री कोण? असा खोचक टोमणा चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना लगावला.

तसेच, अहो ताई… भावनेच्या भरात इतकंही वाहून जाऊ नका की, अंलगट आलं की पुन्हा पवारसाहेब माझ्या वडिलांसारखेच आहेत हे म्हणायची वेळ येईल. थोडा धीरज रखो, सब सच सामने आयेगा… असे टोलाही चाकणकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लगावला आहे.

त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती चिघळण्यास सुरु झाली असल्याचे सध्या तरी पाहायला मिळत आहे. आता रुपाली चाकणकरांनी लगावलेल्या या टोल्यावर चित्रा वाघ काय प्रत्यूउत्तर देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!