नांदेड: जिल्ह्यात कोरोनाचा पादुर्भाव वाढत असल्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने रात्रीची संचारबंदी तर दिवसाची जमावबंदी लागू केली आहे. तसेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दर आठवड्याला शुक्रवारी ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत कोणालाही अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही मुक्त संचार करता येणार नाही.
नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी राज्य सरकारच्या सुचनेनुसार ५ एप्रिल रोजी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यानुसार ५ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून रोज सायंकाळी ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ३० एप्रिल २०२१ रोजी मध्यरात्री पर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. दर आठवड्याला शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत कोणालाही वैध कारणाशिवाय फिरता येणार नाही. वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवांना यामधून वगळण्यात आले आहे. वगळण्यात आलेल्या सेवांमध्ये रुग्णालये, रोग निदान केंद्र, क्लिनीक, वैद्यकीय विमा कार्यालय, औषधी दुकान, औषधी निर्मिती उद्योग, वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, किराणा सामान, भाजीपाल्याची दुकाने, दुध डेअरी, बेकरी, मिठाई व खाद्याची दुकाने यांचा समावेश आहे. रेल्वे, टॅक्सी, ॲटोरिक्षा व सार्वजनिक बसेस चालू राहतील.
विविध देशांच्या परराष्ट्र सबंध विषयक कार्यालये, स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात येणारी मान्सून पूर्व उपक्रम व सेवा स्थानिक प्राधिकरणाद्वारे पुरविण्यात येणारी सार्वजनिक सेवा, मालाची व वस्तूची वाहतूक, शेती संबंधी सेवा, ई-कॉमर्स, मान्यता प्राप्त वृत्तपत्र व त्याच्याशी संबंधीत सेवा, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवांचा समावेश आहे. सार्वजनिक उद्याने व सार्वजनिक मैदाने शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहतील. सोमवार ते शुक्रवारी सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत कोरोनाचे नियम पाळून या सेवा चालू राहणार आहेत. स्थानिक प्रशासनाला कोरोना संसर्गाचा धोका वाटल्यास सार्वजनिक ठिकाणे तात्काळ बंद करण्यात येतील. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजार पेठा, मॉल्स पुर्णदिवस बंद राहणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- ‘सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता दिल्यास फिक्सिंगला प्रोत्साहन मिळेल’
- ‘कोरोना बाधित खेळाडू लवकरच संघात परततील’
- ‘बीसीसीआयकडून योग्य ती खबरदारी ; खेळाडूंसाठी बायो-बबल तयार’
- ‘खराब कामगिरी करीत असताना देखील नेट्समध्ये फलंदाजी सरावास नकार’
- ‘ब्रेक द चेन’ या गोंडस नावाखाली बाजारपेठा बंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

