Share

अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार?

Published On: 

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांच्या आधारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची सी.बी.आय द्वारे चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिल्यानंतर काल देशमुख यांनी राजीनामा दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या शिफारसीनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देशमुख यांचा राजीनामा मंजूर केला आहे. देशमुखांकडील गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यासही त्यांनी मंजूरी दिली आहे.

दरम्यान,गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख थेट दिल्लीला गेले असून ते सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची शक्यता असल्याचे वृत्त सूत्रांकडून मिळत आहे. अनिल देशमुख यांनी दिल्लीत काही कायदेतज्ज्ञांशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.

अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी सीबीआयची टीम मंगळवारी मुंबईत येणार आहे.या चौकशीचा प्राथमिक अहवाल येत्या पंधरा दिवसात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करावा लागणार असल्याने ही चौकशी लवकरात लवकर करण्यासाठी सीबीआयची टीम मुंबईत येणार आहे. सीबीआयच्या टीमकडून अनिल देशमुख यांची देखील चौकशी केली जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!