Share

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला

Published On: 

🕒 1 min read

परभणी: सर्वांना आतुरता लागली होती, तो दिवस आज आला आहे. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता या निवडणुकीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व आ.सुरेश वरपूडकर यांच्या गटात चांगलीच रस्सीखेच होणार आहे. आ.वरपूडकर यांच्या गटाचे पारडे जड असले तरी बोर्डीकर गट अध्यक्षपद खेचून आणण्यासाठी ताकद लावणार आहे.

परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यासाठी असलेल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालक पदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत आ.सुरेश वरपूडकर गटाला १० तर बोर्डीकर गटाला ९ जागा मिळाल्या असून दोन अपक्ष निवडून आले आहेत. निवडणुकीत दोन जागांवरून महाविकास आघाडीत बिघाडी झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.बाबाजानी दुर्राणी यांनी बोर्डीकर गटाकडे धाव घेतली. असे असले तरी निवडणूक निकालानंतर त्यांनी ‘हम चार’चा नारा देत पक्षाला बँकेचे अध्यक्षपद हवे यासाठी आग्रह धरला.

तसेच आपणास कोणी गृहित धरू नये, असे स्पष्ट केल्याने वरपूडकर व बोर्डीकर गटात अस्वस्थता पसरली. दरम्यान, आ.दुर्राणी हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले असून यासाठी त्यांनी मुंबई येथे जावून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली. दोन्ही गटाकडून बँकेचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. वरपूडकर गटाकडून स्वत: आ.सुरेश वरपूडकर हे चेअरमनपदासाठी आग्रही असल्याचे समजते. तर आ.बाबाजानी दुर्राणी देखील अध्यक्षपदासाठी आपली उमेदवारी पुढे करणार असल्याचे वृत्त आहे. गेल्या काही दिवसांत वेगवान घडामोडी घडल्या असून मोर्चेबांधणी व चर्चा करण्यात आल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!