Share

चिन्मय मांडलेकरने खास कारणासाठी आळंदीत ज्ञानेश्वर माउलींचे घेतले दर्शन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता आणि मालिकेचा निर्माता चिन्मय मांडलेकरने आळंदीला जाऊन ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. एका खास कारणामुळे त्याने येथे भेट दिली आहे. कालपासून (२७ सप्टें) सोनी मराठी वाहिनीवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या 725व्या संजीवन समाधी वर्षानिमित्त संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडाची जीवनगाथा हि मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

https://www.instagram.com/p/CUNRMeWqGje/?utm_source=ig_web_copy_link

या मालिकेतून ज्ञानेश्वर माउलींची चरित्रगाथा उलगडणार आहे. चिन्मय मांडलेकर आणि दिग्पाल लांजेकर यांनी या मालिकेची निर्मिती केली असून दिग्पाल या मालिकेचे दिग्दर्शन देखील करत आहे.  भगवद्गगीतेतला विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिणारे आणि पसायदानासारखी अजोड कलाकृती जगाला देणारे संत ज्ञानेश्वर यांची चरित्रगाथा या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोचणार आहे. या मालिकेद्वारे संत ज्ञानेश्वर संपूर्ण जीवनप्रवास उलगडणार आहे.

https://www.instagram.com/p/CUUZ2kUqO0c/?utm_source=ig_web_copy_link

नुकतेच चिन्मय मांडलेकरने आळंदीला जाऊन ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतल्याची पोस्ट इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. या मालिकेची अनेकजण आतूरतेने वाट पाहत होते. अखेर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्याने अनेकांकडून आनंद व्यक्त केला जातोय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!