इंदौर: प्रवासा दरम्यान वेगवेगळ्या कारणांवरून वाद झाल्याचे आपण ऐकले असेल मात्र मध्य प्रदेशमधील इंदूर शहरामध्ये विमानतळावर एक विचित्र घटना घडली आहे. यावेळी एका महिलेने विना तिकीट विमानतळावर प्रवेश केला. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुरक्षारक्षकांनी तिला चौकाशी साठी अडवले असता. तिने चांगलाच गोंधळ घालत आपल्याला विमानतळावर प्रवेश देण्याची मागणी केली. या महिलेने घातलेला गोंधळ पाहून या प्रवेशद्वाराजवळ बघ्यांची गर्दी झाली होती.
विशेष म्हणजे सुरक्षारक्षकांसोबत हुज्जत घालताना या महिलेने चक्क आपण ‘मी राहुल गांधींची होणारी पत्नी आहे असं सांगितलं. तसेच राहुल गांधी मला भेटायला येत नाहीत म्हणून मीच त्यांना भेटायला जात असून त्यांच्याशी लग्न करायला जायचं आहे.’ असे सांगितले. तर ‘जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा तुम्ही सारे लोकं मला सलाम कराल, असंही ही महिला सुरक्षारक्षकांना म्हणाली.
दरम्यान सुरक्षारक्षकांनी अखेर पोलिसांना बोलावल्यानंतर या महिलेची चौकशी केली असता ती महिला परदेशीपुरा येथील रहिवाशी असून ती मानसिक रुग्ण असल्याची माहिती समोर आली. मागील काही दिवसांपासून ही महिला आपल्या घरातून पळून जात असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. अनेकदा ही महिला घरातून पळून जाते आणि बाहेरच्या लोकांशी कोणत्याही कारणावरुन वाद घालते असंही पोलिसांना समजलं. तर या घटनेमुळे सर्वांनाच अचंबित करणारा प्रकार ठरला.
महत्वाच्या बातम्या
- ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट शेअर करायला नको होती
- शेतकरी आंदोलनात फूट पडल्यामुळे या लढ्याला काही अर्थ उरला नाही : नरेश टिकैत
- ऑस्ट्रेलियामधील वर्णभेद घटनेनंतर इंग्लंडने उचलले ‘हे’ मोठे पाऊल
- सलग चौथ्या वर्षी मालमत्ता करवाढ न करण्याचा आयुक्ताचा निर्णय
- “क्रिकेट ग्राउंडच विकत घे,” इरफान पठानचा रिषभ पंतला मजेशीर सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

