🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. या लॉकडाऊनच्या काळात फेरीवाले व पथविक्रेत्यांवरही निर्बंध लागू केले आहेत. यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारने प्रत्येकी १५०० रुपये सहाय्यता अनुदान देण्याचे जाहिर केले होते. त्यानुसार जवळपास दीड महिन्याच्या कालावधीनंतर शहरातील ११ हजार ६०३ फेरीवाल्यांच्या बँक खात्यावर १५०० रुपयाचे अनुदान जमा झाले आहे. यामुळे फेरीवाल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
फेब्रुवारी महिन्यात राज्यभरात कोरोना संसर्गाची दुसरी लाट पसरली. मार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोनाच्या लाटेचा झपाटयाने प्रादुर्भाव वाढत गेला. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने तातडीने कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला. हे कडक निर्बंध लागू करताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हातावर पोट असणार्या आर्थिक दुर्बल घटकासाठी पॅकेज जाहिर करुन फेरीवाले व पथविक्रेते, रिक्षाचालक यांना मदत म्हणून प्रत्येकी १५०० रुपये देण्याची घोषणा केली. या घोषणेची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी नगरविकास विभागाने शासन निर्णय देखील काढला.
फेरीवाले, पथविक्रेते, रिक्षाचालक यांना निर्बंधाच्या काळात उदरनिर्वाहासाठी सहाय्य व्हावे, म्हणून दुर्बल घटकांसाठी पॅकेज जाहिर करुन १५०० रुपये अनुदान थेट बँक खात्यावर जमा करण्यासाठी अनुदान मंजूर केले. शहरात १४ हजार १०३ फेरीवाल्यांची नोंदणी झालेली आहे. त्यापैकी ११ हजार ६९३ फेरीवाल्यांनी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आत्मनिर्धार योजनेंतर्गत कर्जासाठी बँकांमध्ये अर्ज दाखल केलेले आहेत. त्यानुसार २९ एप्रिल पासून थेट फेरीवाल्यांच्या बँक खात्यावर १५०० रुपये अनुदान जमा करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- म्युकरमायकोसिसला वेगवेगळ्या रंगांनी नवी ओळख देणं चूकीचे ; तज्ञांचे स्पष्टीकरण
- निर्बंध लावा पण दुकानं उघडू द्या, अन्यथा…; पुणे व्यापारी महासंघाचा मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे इशारा
- दिलासादायक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक ट्रान्सजेंडर व्यक्तीला सरकारतर्फे 1500 रुपयांची मदत जाहीर
- बाप रे! ब्लॅक आणि व्हाइट फंगसनंतर आता उत्तरप्रदेशात आढळला यल्लो फंगसचा रुग्ण
- मोदींकडून ‘रडी’चा डाव! भावूक झाल्यानंतर ‘या’ व्हिडिओने केली मोदींची पोलखोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

