मुंबई : राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी व सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांच्यासह त्यांचे सुपुत्र व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.
सुरुवातीला हे दोघेही घरीच विलगीकरणात होते. मात्र, प्रकृती खालावल्याने रश्मी ठाकरे यांना HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ३० मार्च रोजी रश्मी ठाकरे यांना या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरे मात्र राजकीय बैठका, कोरोना नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांच्या बैठक यात व्यस्त होते. पत्नी व मुलगा कोरोनाग्रस्त असताना देखील त्यांनी राज्याच्या जबाबदारीचे भान राखून कामात कोणतीही दिरंगाई न केल्याने मित्र पक्षातील नेत्यांनी त्यांचे कौतुक देखील केले होते.
दरम्यान, आज संध्याकाळी त्यांना HN रिलायन्स हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची तब्येत देखील चांगली असल्याची माहिती मिळत आहे. आदित्य ठाकरे यांना 20 तारखेला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर २३ मार्च रोजी रश्मी ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. या आधी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे यांनी देखील लसीकरण करून घेतले होते.
महत्वाच्या बातम्या
- राठोड गेले, देशमुख गेले, आता अनिल परबांचा नंबर : किरीट सोमय्यांचे भाकीत
- ‘आबांनंतर आदर्श गृहमंत्री म्हणून अनिल देशमुखांना पाहिले गेले, मात्र भाजपमुळे…
- एमआयएमच्या शाहनवाज खानसाठी खैरेंचा दबाव – सत्तारांचा गंभीर आरोप
- राज ठाकरेंचे भाकीत पुन्हा खरे ठरले, फटाक्याची माळ लागण्यास सुरवात झाली !
- शरद पवारांचा ‘पी.ए’ ते थेट महाराष्ट्राचा गृहमंत्री… दिलीपराव वळसे पाटील यांचा थक्क करणारा प्रवास !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

