Share

विराटच्या विजयाचा रथ रोखण्याचे मॉर्गनपुढे आव्हान; सुपर संडे मध्ये आज आरसीबी-केकेआर भिडणार

Published On: 

मुंबई : आयपीएलमध्ये आज रविवारी होणाऱ्या सामन्यात विराट कोहलीचा बेंगळुरु रॉयल चॅलेंजर्स आणि इयान मॉर्गनचा कोलकाता नाइट रायडर्स संघ यांच्यात लढत होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम या मैदानावर हा सामना दुपारी ३.३०ला सुरु होईल. स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य असलेल्या आरसीबीचा रथ रोखण्याचे अव्हान केकेआर समोर आसणार आहे.

सलग दोन सामने जिंकल्याने विराट कोहलीच्या आरसीबी संघाचा अत्मविश्वास चांगलाच दुणावलेला आहे. आजच्या सामन्यात केकेआरला हरवुन विजयाची हॅटट्रिक करण्याचा इरादा कोहलीचा असेल. आरसीबीच्या संघात फारसे बदल होण्याची शक्यता कमीच आहे. युवा गोलंदाज शाहबाझ अहमद आणि हर्षद पटेल हे दोघे गोलंदाजीची धुरा संभाळतील तर फलंदाजीत पडिक्कल, कोहली, मॅक्सवेल, एबी डिव्हीलीयर्स यांचा समावेश निश्चीत मानला जात आहे. आतापर्यंतच्या स्पर्धेत चांगली सुरुवात करुणही विराट अपयशी ठरत असल्याने आज त्याच्या कामगीरीकडे सर्वांचे लक्ष्य असेल.

तर केकेआरला मुंबई इंडियन्सच्या हातून मागील सामन्यात दारुण पराभव स्विकारावा लागला. आजच्या सामन्यात पुनरागमन करण्याच्या हेतुने मैदानावर उतरेल यात शंका नाही. केकेआरचा अष्टपैलु खेळाडू आंद्रे रसलची बॅट अद्यापही तळपली नाही. मात्र त्याने गोलंदाजीत चांगली चमक दाखवली आहे. दुसरीकडे सलामीवीर वगळता तर मधल्या फळीतील फलंदाज अपयशी होत असल्याने कर्णधार मॉर्गन चिंतेत आहे. चेन्नई येथे १५०-१६० धावा विजयासाठी पुरेश्या असल्याचे आतापर्यत झालेल्या सामन्यावरुन स्पष्ट होते. तेव्हा आजच्या सामन्यात नाणेफेक महत्वाची मानली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!