मुंबई : अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर आता महाराष्ट्राचा नवा गृहमंत्री कोण असा प्रश्न सध्या चर्चे होता. गृहमंत्रीपद हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवले जाणार असल्याचा दावा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज दुपारी केला होता .तसेच गृहमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या नावाची चर्चा सुरु होती.
परंतु आता कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे. गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असेही या पत्रात म्हटले आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली आहे.
अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी होणार !
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपये वसुलीच्या कथित आरोपाप्रकरणी हायकोर्टात आज सुनावणी घेण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआयने 15 दिवसात प्राथमिक चौकशी करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयात परमबीर सिंह यांच्यासोबत वकील जयश्री पाटील यांनीदेखील याचिका केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्यासहित दाखल इतर दोन जनहित याचिका फेटाळून लावत वकील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर हे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाने असं सांगितलं की, अनिल देशमुख हे गृहमंत्री पदावर असल्याने पोलिसांकडून या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होण्याची शक्यता कमी असल्याने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झालीये; भाजपची खरमरीत टीका
- आता नवा वसुली मंत्री कोण ? चित्रा वाघ यांचे टीकास्त्र
- देशमुख दिल्लीला रवाना; आता सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणार की फक्त ‘त्या’ नेत्याची भेट घेणार ?
- या सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील ; पंकजा मुंडेंचे मोठे विधान
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राजीनामा दिलाच पाहिजे : रामदास आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
