🕒 1 min read
बीड : मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना महापूर आल्याने शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकरी बांधवांचं उभं पीक वाहून गेल्याचं आणि शेतात गुडघ्यापर्यंत पाणी साचून जमिनीवर मोठमोठे खड्डे पडल्याचे निदर्शनास येत आहे. शहरातील व ग्रामीण भागातील रस्त्याचे व पुलांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे लवकरच मोठी घोषणा करुन बळीराजाला या संकटातून बाहेर काढतील. तसेच या संकटप्रसंगी शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.
गत पंधरा दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील शेकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप पीके उध्दवस्त झालेली आहे. शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधीत भागाची पाहणी केली. खैरे यांनी गेवराई तालुक्यातील नागझरी येथे अतिवृष्टीबाधीत शेतकऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी माजी मंत्री बदामराव पंडित, औरंगाबाद विधानसभा संघटक राजू वैद्य यांची उपस्थिती होती.
अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, तूर, उडदाचे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी पूर्ण अडचणीत आलेला असून शेतीचे नुकसान झालं आहे. शेत पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आता साधारणतः चार-पाच वर्षे तरी जमीन व्यवस्थित होणार नाही, अशी परिस्थिती आहे. खोलीकरण नसल्यामुळे पाणी सगळ्या शेतांमध्ये आलेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अशीच परिस्थिती आहे. या अतिवृष्टीबाधीत भागाची पाहणी करण्यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे सोमवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. बीड तालूक्यातील घोडका राजुरी येथील मुख्य रस्त्यावरील पूल अतिवृष्टीमुळे वाहून गेलेला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना खुप अडचणी येत आहेत त्यानुषंगाने खैरे यांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. ग्रामस्थांना वाहून गेलेला पूल पुन्हा केला जाईल, असे आश्वासन दिले. तसेच ढेकणमोहा येथे अतिवृष्टीबाधीत भागाची पाहणी आणि शेतकऱ्यांना किराणा किटचे वाटप करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- नर्सिंग ‘एएनएम’ अभ्यासक्रमांची उद्यापासून परीक्षा; मराठवाड्यातील २० केंद्रावर बैठक व्यवस्था
- ‘ही नौटंकी असली तरी मोदींनी यांना कुठून कुठपर्यंत आणले आहे’, राणे यांची बोचरी टीका
- येऊ कशी तशी मी..’फेम अन्विताचा ट्रेंडिग गाण्यावरचा दिलखेच ‘ठूमका’
- शेतकऱ्यांची चेष्टा केल्याप्रकरणी मंत्रिमंडळातून वडेट्टीवार यांची हकालपट्टी करा- लोणीकर
- ‘साहेब, आमची दिवाळी गोड करा; शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून मन सुन्न झाले’, फडणवीसांच्या भावना

