मुंबई : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील केंद्र सरकारला यावरून फटकारलं असून विरोधकांनी देखील हल्लाबोल केला आहे. अशातच, खतांची दरवाढ केल्याने काँग्रेस अधिक आक्रमक झाली असून शेतकरीवर्गाने देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारला लक्ष्य करतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा देखील समाचार घेतला आहे.
चंद्रकांत पाटील यांना काल काँग्रेसचं टूल किट आणि राहुल गांधी हे करत असलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पाटील म्हणाले, ‘जर देशात लोकसभेच्या निवडणुका उद्या घेतल्या, तर मोदी 400 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवतील.’
त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत निवडणूक घ्याव्याच असं आव्हान दिलं आहे. ‘भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलच लोकसभा निवडणूक घेण्याची मागणी करत आहेत याचाच अर्थ मोदी अपयशी ठरले आहेत हे आता भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कळून चुकले आहे. मोदींचा राजीनामा घेऊन गडकरींना पंतप्रधान करावे अशी मागणी भाजपाचेच काही नेते करत आहेत. चंद्रकांत पाटलांच्या मागणीला आमचा पाठिंबा असून त्यांनी मोदींना राजीनामा द्यायला सांगून निवडणुका घ्यायला सांगाव्यात. म्हणजे देशातील जनतेच्या मनात काय आहे आणि कोणाच्या किती जागा येतील ते ही कळेल, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- उस्मानाबादेत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट मात्र मृत्युदर कायम
- अखेर ‘त्या’ वादावर पडदा ; जयंत पाटलांच्या प्रकल्पांना मंजूरी
- ‘शेतक-यांचे मरण हेच मोदी सरकारचे धोरण’, खत दरवाढी विरोधात काँग्रेसचं ‘घंटानाद’ आंदोलन
- पुलाखाली आढळला युवकाचा मृतदेह; बोरगावात एकच खळबळ
- बीसीसीआयच्या महिला आणि पुरुष संघातील भेदभावावर हरमनप्रितने टाकला पडदा, दिले ‘हे’ उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

