Share

आवरा यांना ! भाजप नेता कोरोनाला घालवण्यासाठी यज्ञ कुंड घेऊन रस्त्यावर फिरतोय…

Published On: 

मेरठ : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अनेक रुग्णांचा जीव जात आहे. आरोग्यव्यवस्था अक्षरशः कोलमडली आहे. अशात मात्र भाजप नेत्यांचा वाचाळपणा आणि अवैज्ञानिक दृष्टीकोन काही कमी होताना दिसत नाही. मेरठ येथील भाजपाचे नेते गोपाल शर्मा यांनी करोना व्हायरसला संपवण्यासाठी वेगळाच उपाय केला आहे. गोपाल शर्मा यांनी यज्ञ कुंडातील धुरापासून आणि शंख नादातून करोना विषाणू संपवता येऊ शकतो असे म्हणत व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये गोपाल शर्मा सायकलवर एक यज्ञ कुंड घेऊन फिरताना दिसत आहेत. यज्ञामध्ये गोवऱ्या, देशी गायीचे तूप, आंब्याच्या झाडांच्या काड्या, कापूर हे सगळं एकत्र करून हवन पेटवण्यात आल्याचं शर्मा यांनी सांगितले आहे. यज्ञ कुंडातल्या धुरामधून वातावरणातील हवा शुद्ध होते आणि हानिकारक विषाणू नष्ट होतो. तसेच ऑक्सिजचं प्रमाण देखील वाढते असा दावा गोपाल शर्मा यांनी केला आहे.

दरम्यान, याआधी देखील करोना विषाणू पासून वाचण्याचा दावा अनेक राजकारण्यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी गोमूत्र प्यायल्याने करोना होत नसल्याचा दावा केला होता. तसेच करोनाची दुसरी लाट सुरू असताना लोकांनी एकवेळा यज्ञ करावा, असे आवाहन मध्य प्रदेशच्या सांस्कृतिकमंत्री उषा ठाकूर यांनी केले होते.

पहा व्हिडीओ

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!