अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- काल दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सुदाम जाधव या आरोग्य कर्मचाऱ्याचा उल्लेख केला. सध्या माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येत आहे.
अहमदनगर येथील सुदाम जाधव हे संगमनेर तालुक्यातील बोटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत. यांच्या तत्परतेमुळे एका महिलेचा जीव वाचला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सुदाम जाधव यांचा उल्लेख करून त्यांचे कौतुक केले.
संगमनेर तालुक्यातील बोटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुदाम जाधव कार्यरत आहेत. सध्या माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम अहमदनगर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. झालं असं की, या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाचे पथक बोटा गावात तपासणी करीत होते. त्या पथकात जाधवही आपले काम करत होते.
यावेळी त्यांना या गावातील एक ६८ वर्षीय महिलेला ताप, सर्दी व श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे जाणवले. जाधव यांनी तपासणी केली असता या महिलेची ऑक्सिजन पातळी ७८ टक्के आढळून आली. जाधव यांनी तात्काळ पथकाचे प्रमुख डॉ.कापसे यांच्याशी संपर्क साधला. महिलेला तातडीने संगमनेरच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये हलवून उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर लगेच त्या महिलेची कोरोना चाचणी करून घेण्यात आली. त्यात त्या महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले.
सुदाम जाधव यांच्यामुळे त्या महिलेला वेळेत उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला. त्यांच्या या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही जाधव यांचे कौतूक केले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही काल जाधव यांचा उल्लेख केला.
महत्वाच्या बातम्या :-
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

