Share

मराठा समाजातील राजकीय नेते, शिक्षण व सहकारसम्राटांमुळेच मराठा समाज भरडला जात आहे : राजेंद्र कोंढरे

Published On: 

मुंबई : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यभरात विविध आंदोलनं मराठा समाजातर्फे करण्यात येत आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला काल तुळजापूरातून सुरुवात करण्यात आली आहे. भवानी आईच्या दारात जागरण-गोंधळ करून आरक्षणासाठीच्या लढ्यासाठी आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे.

याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी पत्रकार परिषद घेऊन समाजाची असलेली परिस्थिती व सद्याच्या घडामोडींवर भाष्य केलं आहे. मराठा समाजातील गर्भश्रीमंत आणि मध्यमवर्गीयांची मराठा समाजातीलच गरिबांशी नाळ तुटली आहे. त्यामुळेच मराठा समाजाला आज स्कॉलरशीपसाठी हात पसरावे लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती शाहू महाराज यांचे केवळ घरात फोटो लावण्यापेक्षा त्यांचा कृतीशील विचारांचा वारसा चालवा. आपापल्या परिने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून मराठा समाजातील बेरोजगारांना हात देऊन हृदयाची संवेदना जागृत करा असे आवाहन देखील राजेंद्र कोंढरे यांनी केलं आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षेस बसणा-या विद्यार्थ्यां च्या तुलनेत पुढे रोजगार उपलब्ध होत नाहीत. जो-तो एमपीएससीची तयारी करतो. पण राज्य सरकारकडुन अशा परीक्षा वेळोवेळी होत नाहीत. मॅटसह अनुशेष घोटाळे पाहता एमपीएससीला प्रचंड प्रमाणात विद्यार्थी बसतात. पण यातुन निवड होण्याचे प्रमाण एक टक्का असल्याने, उर्वरित 99 टक्के पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना संधी मिळत नाही. त्यामुळे पुढे आरक्षणाची टक्केवारी लावताना अनेक त्रुटीमुळे विद्यार्थ्यांना संधी मिळत नसल्याने भविष्यात संघर्ष होणारच आहे. यासाठी शासनाने यात पारदर्शकता आणणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणून देत केवळ एमपीएससी एवढेच न पाहता, रोजगाराच्या इतरही संधीकडे पासुन वाटचाल करण्याचे आवाहनही राजेंद्र कोंढरे यांनी केले. यासाठी समाजातील गर्भश्रीमंत व उच्च मध्यम वर्गीय घटकांनी विद्यार्थ्यांना मदतीचा हात द्यावा.

मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश झाला असून आम्ही राजकीय आरक्षण नाकारले आहे हे ओबीसी नेत्यांनी लक्षात घ्यावे, असे सुचक वक्तव्य करत राज्यात आरक्षणाची चोरी होत आहे. शिवाय मराठा समाजातीलच राजकीय नेते, शिक्षण व सहकारसम्राटांमुळेच मराठा समाज भरडला जात आहे. मतांच्या भीतीपोटी ह्या त्रुटी दूर केल्या जात नसल्याचा आरोपही राजेंद्र कोंढरे यांनी केला. मराठा समाजातल्या राजकारण्यांच्या ‘प्रो मराठा’ वागण्याने आणि मोठ्या चेहऱ्याकडे बघून प्रश्न नाकारले जात असल्याने कुंकू असून विधवा अशी समाजाची अवस्था झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!