मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीवर गेल्या 50 वर्षांपासून कसदार अभिनयाने गारूड घालणारे महानायक अमिताभ बच्चन, आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज करणारे बॉलीवूडचे बिग बीं यांचा काल ७८ वा वाढदिवसा होता. बिग बीं यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या चात्यांनी त्यांना सोशल माध्यमातून भरभरून शुभेच्छा दिल्या, बिग बींच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा वाढदिवस देखील साजरा केला आणि त्याचे फोटो सोशल माध्यमावर शेअर देखील केले.
तसेच कोलकातामध्ये अमिताभ बच्चन यांचे फॅन्स त्यांना ‘गुरू’ म्हणून संबोधतात. याठिकाणी 2001 मध्ये अमिताभ बच्चन यांचे मंदिर बांधण्यात आले होते. ज्यानंतर दरवर्षी याठिकाणी मोठ्या धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्यात आला. याठिकाणी हवन-पूजेबरोबरच भंडारा देखील आयोजित केला जातो. कोरोना व्हायरसमुळे यंदा साधेपणाने वाढदिवस साजरा करण्यात आला.
बिग बीं यांनी सोशल माध्यमाद्वारे चाहते आणि शुभचिंतकांचे आभार मानले आहे. काल बिग बींच्या वाढिवसानिमित्ताने देशभरात त्यांच्या चाहत्यांनी त्यांचा वाढदिवस जोरदार साजरा केला. चाहत्यांच्या या प्रेमाचे बिग बीं यांनी मनःपूर्वक आभार मानले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

