🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला दणका दिला. शिवसेना आणि काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणावर फुटल्याने, पुरेशी मते नसतानाही भाजपाचे पाचही उमेदवार निवडून आलेत. निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ होते. शिंदे शिवसेनेच्या १३ आमदारांसह गुजरातमध्ये आहेत. एकनाथ शिंदेच्या नाराजीमुळे शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडणार का, अशी चर्चा सुरू आहे. शिंदेच्या नाराजीमुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिंदेंच्या या भूमिकेवर रामदास आठवले यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जबरदस्त दणका दिला आहे.महाविकास आघाडी चे सरकार अल्पमतात आल्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही.
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) June 21, 2022
“एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जबरदस्त दणका दिला आहे. महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आल्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही”. असे ट्विट केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
एकनाथ शिंदे यांनी कोणता ठेवला प्रस्ताव?
उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन एकनाथ शिदेंच्या भेटीला निघालेले मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांना एकनाथ शिंदेंची नाराजी काढण्यात यश मिळेल का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या भेटीमध्ये एकनाथ शिंदेंनी दोन प्रस्ताव शिवसेनेपुढे ठेवले आहेत. यामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप सोबत सरकार स्थापन करावं आणि देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करावं असा प्रस्ताव ठेवला.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
