Share

Eknath Shinde Update : नार्वेकरांच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी ठेवले हे दोन प्रस्ताव

Published On: 

सुरत : शिवसेनेचे दोन नेते मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांची जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट झाली आहे. या भेटीवेळी या दोन्ही नेत्यांना सुरुवातीला हॉटेलच्या आता बराच वेळ सोडण्यात आले नव्हते. मात्र आता गेल्यानंतर लगेच हॉटेलमधून दोन मिनिटांत नार्वेकर बाहेर पडले. एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकनाथ शिंदे चर्चेसाठी तयार झाले होते.

उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन एकनाथ शिदेंच्या भेटीला निघालेले मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांना एकनाथ शिंदेंची नाराजी काढण्यात यश मिळेल का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या भेटीमध्ये एकनाथ शिंदेंनी एक प्रस्ताव शिवसेनेपुढे ठेवले आहेत. यामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप सोबत सरकार स्थापन करावं. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करावं, असा प्रस्ताव समोर ठेवण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे जवळपास २६ पेक्षा जास्त आमदार घेऊन सुरतमधील मेरेडीयन हॉटेलमध्ये आहेत. त्यांच्या या बंडाळी नंतर त्यांना गटनेते पदावरून हटवण्यात आले आहे. मात्र याआधी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन उपमुख्यमंत्री पद घेण्यापेक्षा मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो. त्यांनी शिवसेनेत परत येऊन मुख्यमंत्री बनावं, अशी ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली असल्याचं वृत्त न्युज 18 लोकमतने दिल आहे.

दरम्यान, दुसरीकडे भाजपकडून त्यांच्या १०६ आमदारांना परराज्यात नेण्याची तयारी सुरु असल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजप त्यांच्या आमदारांना गोवा किंवा गुजरातमध्ये नेणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भाजपची सरकार स्थापनेची फिल्डिंग सुरु आहे अशी चर्चा रंगू लागल्या आहेत. यासह कॉंग्रेसच्या देखील सर्व आमदारांचे लोकेशन ट्रेस करणे सुरु आहे. आता कॉंग्रेस देखील खबरदारी म्हणून आमदारांची शोधाशोध घेत आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!