मुंबई : मराठी रंगभूमीचे, चित्रपट सृष्टीचे जेष्ठ कलावंत रवी पटवर्धन यांचे आज निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रवी पटवर्धन हे एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते होते. भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायकी/नकारात्मक प्रवृत्तीच्याच भूमिका मिळत गेल्या असल्या तरी त्यांनी नाटकांत सर्व प्रकारच्या भूमिका केल्या. रवी पटवर्धनांनी दीडशेहून अधिक नाटकांत आणि २०० हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या.
रवी पटवर्धन यांच्या निधनाने चरित्र भूमिकेला आपल्या अभिनयाने भारदस्तपणा मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याला आपण मुकलो. त्यांनी प्रत्येक लहान मोठ्या भूमिकांत अक्षरशः प्राण ओतला. एकाच साच्याच्या भूमिका न करता त्यांनी वैविध्य ठेवले अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रवी पटवर्धन यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
रवी पटवर्धन यांनी आरण्यक हे नाटक पहिल्यांदा १९७४ मध्ये रत्नाकर मतकरींबरोबर केले आणि वयाच्या ८२ व्या वर्षीही ते ह्या नाटकात तीच धृतराष्ट्राची भूमिका करत आहेत. वयपरत्वे येणाऱ्या विस्मरणाच्या मोठ्या धोक्यावर विजय मिळवून, मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी श्याम मानव यांच्याकडून स्वसंमोहन शास्त्र शिकून घेतले.
या विषयावरच्या साहित्यावर खूप अभ्यास केला व त्या शास्त्राचा वापर करून स्वतःच्या अनेक व्याधींवर मात केली. शिवाय आत्मविश्वास हरवलेल्या व्यक्ती आणि व्याधिग्रस्तांवरही रवी पटवर्धन यांनी या उपचारपद्धतीचा वापर केला व त्याचा त्यांना खूप फायदा करून दिला. अगबाई सासूबाई ही त्यांची शेवटची मालिका ठरली.
महत्वाच्या बातम्या
- कृषी कायदे रद्द होणारच नाहीत; चंद्रकांत पाटलांचे शरद पवारांना उत्तर
- एकता, समता, बंधुता, सर्वधर्मसमभावाचा विचारच देशाला व समाजाला पुढे घेऊन जाणार – अजित पवार
- मास्क न वपणाऱ्यांना अनोखी शिक्षा; खुले तुरुंग आणि कोरोनाविषयी निबंध
- ‘जे जे पक्ष काँग्रेस बरोबर गेले त्यांचे प्रचंड नुकसान झाले,शिवसेनेवर देखील हेच दिवस येणार’
- सामन्यांच्या खिशाला कात्री, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत पेट्रोल नव्वदी तर डीझेल ऐंशीच्या पार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

