Share

वीजपुरवठा खंडित प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संध्याकाळी बोलावली महत्त्वाची बैठक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : यंदा संपूर्ण देश कोरोनाच्या संकटातून जात आहे. अशातच राज्यात परतीचा पाऊस, कीड, अतिवृष्टी, आदी संकटांची भर पडत आहे. तर, मुंबईच्या चिंतेत अजून एक भर पडली असून अवघी मुंबई वीजसंकटात सापडली आहे. मुंबईसह उपनगरामध्ये आज सकाळी अचानक वीज पुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे लोकल सेवाही ठप्प झाली आहे. सर्वसामान्य लोकांपासून ते जवळपास सर्वच क्षेत्रांना याचा मोठा फटका बसला आहे.

दरम्यान, मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशीदेखील त्यांनी चर्चा केली व मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. भविष्यात परत अशी घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगावी असेही त्यांनी सांगितले.

तर मुंबई महानगर क्षेत्रातील वीजपुरवाठा खंडित प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी 4 वाजता वर्षा येथे तातडीने महत्वाची बैठक बोलाविली आहे. या बैठकीस ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्रसाद तनपुरे , ऊर्जा सचिव असीम गुप्ता सहभागी होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!