🕒 1 min read
पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गतवर्षी देखील आषाढी वारीवर राज्य सरकारने निर्बंध लादले आहेत. यावरती हभप बंडातात्या कराडकर यांनी वारकऱ्यांना पायी दिंडी काढण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यानंतर त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यावर बराच वादंग निर्माण झालेला.
तथापी, मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा पार पडणार आहे. या पूजेला व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष हभप बंडातात्या कराडकर यांनी विरोधी दर्शवला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘ सर्व संतांच्या पालख्या पायी जाण्याची प्रथा मोडून काढायची. पालखीसोबत फक्त ५० वारकरी पायी चालू द्या, ही विनंतीही धुडकावून लावायची. पायी चालणाऱ्या वारकऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करायची, पताका, टाळ, चिपळी हिसकावून घ्यायची तरीही पांडुरंगाची महापूजा करण्याचा घाट कशासाठी? मुख्यमंत्र्यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगून विठ्ठलाच्या महापूजेला येऊ नये, असा संताप ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी व्यक्त केला आहे.
संतांचा व भगव्या ध्वजाचा पदोपदी अपमान व अनादर होत असताना आपल्या हातून होत असलेली महापुजा पांडुरंगाला मान्य होणार नाही. म्हणून मुख्यमंत्र्यांनी महापुजेला येण्याचे टाळावे, असे मत जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी व्यक्त केले… #मामु विचार करा, जे औरंगजेबाला जमलं नाही pic.twitter.com/WWK6i7buFN
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLA) July 19, 2021
तसेच ‘संतांचा अनादर करून केलेली महापूजा पांडुरंगाला मान्य होणार नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी महापूजेला येण्याचे टाळावे. मुख्यमंत्र्यांची दांभिक पूजा पांडुरग स्वीकारणार नाही’. असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सेव्हींग ठेवलीच पाहिजे, आपल्या करिअरचा काही भरोसा नाही’ ; सचिनचा कलाकारांना सल्ला
- ईडीच्या रडारवर असलेले अनिल देशमुख अटकेच्या भीतीने ‘नॉट रिचेबल’
- नंदुरबार अपघात; पंतप्रधान मोदींकडून मराठीत ट्विट करत मदत जाहीर
- नंदुरबारमध्ये गाडी दरीत कोसळली; भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू, १५ जखमी
- ‘दलित, ओबीसी, शेतकऱ्यांची मुले मंत्री बनले म्हणून काही लोकांना पोटशूळ’; विरोधकांच्या गोंधळावर मोदींच भाष्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
