Share

‘मुख्यमंत्र्यांनी यावं म्हावरं खावं, पाहुणचार करावा अन् परत जावं’- नारायण राणे

Published On: 

सिंधदूर्ग : शिवसेना विरुद्ध नारायण राणे हा संघर्ष काही नवा नाही. पण या संघर्षाचा नवा अंक उद्या सिंधुदुर्गात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचं उद्घाटन केलं जाणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील उपस्थित राहणार आहेत.

राणे यांनी उद्याच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. चिपी विमानतळाच्या कामात शिवसेनेचा काहीच संबंध नाही. उलट यांच्या नेत्यांनी विमानतळाच्या कामांना विरोध केला, असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.

‘विकास प्रकल्पांना आधी विरोध करायचा आणि प्रकल्प पूर्ण झाले की श्रेय घ्यायला यायचं, ही शिवसेना नेत्यांची वृत्ती आहे. राज्याचे मुख्यमंत्री असल्यानं उद्धव ठाकरे यांनी आमच्या सिंधुदुर्गात यावं, आम्ही त्यांचा पाहुणचार करू, मालवणचं म्हावरं खावं आणि परत जावं’, असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे.

चिपी विमानतळाचं सर्व श्रेय भाजप आणि आमचं आहे. हे इतर कुणाचंही श्रेय नाही. पाहुणे म्हणून आम्ही बोलावलं आहे. पाहुणे म्हणून या, पदाप्रमाणं काहीतरी द्या आणि जा, असं राणे म्हणाले आहेत.

एकीकडे शिवसेना आणि सत्ताधारी पक्षाकडून चिपी विमानतळ उभं केल्याचे बॅनर्स झळकावले जात असताना दुसरीकडे नारायण राणेंनी चिपी विमानतळ उभारण्यासाठी मीच प्रयत्न केले असून त्याचं श्रेय माझं आणि भाजपाचं असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ सुरू होण्याआधीच त्याच्या श्रेयावरून वाद मात्र सुरू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!