Share

‘कामावर रुजू झाल्यास कारवाई मागे घेणार का?’; एसटीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले…

Published On: 

मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन (ST Workers on Strike) तसेच संप पुकारले आहे. एसटी सेवा बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे मात्र खूप हाल होत आहेत. त्याच सोबत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील परीक्षेसाठी येण्या जाण्यासाठी एसटी बस नसल्याने गैरसोयीला सामोरे जावे लागले. आता हा संप मागे घेण्यात यावा यासाठी राज्यसरकार कारवाई देखील करत आहे. मात्र अद्यापही हजारो कर्मचारी कामावर रुजू होण्यास तयार नाहीत.

या संबंधी माहिती देताना एसटीचे व्यवस्थापकीय महासंचालक शेखर चन्ने (Shekhar Channi) म्हणाले, वारंवार आवाहन करूनही एसटी कर्मचारी कामावर हजर न राहिल्याने महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. संप सुरू झाला होता यावेळी ९२ हजार कर्मचारी पटलावर होते, दोन हजार कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती झाली होती. तसेच कालपर्यंत ३ हजार १०० कर्मचारी सेवेतून बडतर्फ झाले आहेत, अशी माहिती शेखर चन्ने यानं दिली आहे.

ज्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फची कारवाई करण्यात आली आहे ते कर्मचारी पुन्हा सेवेवर रुजू झाल्यास त्यांच्यावर झालेली कारवाई मागे घेत त्यांना कामावर रुजू करून घेणार का, असा प्रश्न विचारला असता शेखर चन्ने म्हणाले, शक्यतो बडतर्फ झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार नाही, ती तेवढी सहज प्रक्रिया नाही, ती क्लीष्ट प्रक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!