Share

सरसकट मालमत्ता कर माफ करा; आशिष शेलारांची स्वाक्षरी मोहीम

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मुंबई मधील गावठाण तसेच कोळीवाडा ही मूळचे मुंबईकरच. मुंबईचे मुळ रहिवासी असलेल्या आगरी, कोळी बांधवांची मुंबईत ८४ हून अधिक गावठाण आणि कोळीवाडे आहेत. यासाठी स्वतंत्र डिसीआर नसल्याने त्यांचा पुनर्विकास होऊ शकलेला नाही, त्यामुळे ठाकरे सरकारने जो मालमत्ता कर माफीचा निर्णय घेतला आहे तो या भागांना देखील लागू होतो. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी या संदर्भात स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे.

एकिकडे कोस्टल रोड, समुद्राचे पाणी गोडे करणे यासारख्या प्रकल्पांमुळे या कोळी बांधवांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. मच्छीमार बांधव प्रचंड अडचणीत आहे. शिवाय त्यांना इतरांन प्रमाणे कोरोना आणि लॉकडाऊनचा फटकाही बसलाच आहे. त्यामुळे या मुळ मुंबईकरांचा अत्यंत संवेदनशीलपणे सरकारने विचार करण्याची गरज असल्याचे सांगत आमदार आशिष शेलार यांनी कोळीबांधवांच्या घरांना सरसकट मालमत्ता कर माफ करावा अशी मागणी पत्राव्दारे केली आहे.

या मागणीच्या समर्थनासाठी आज आणि उद्या दोन दिवसांचे स्वाक्षरी अभियान खार दांडा कोळीवाड्यांत राबविण्यात येत आहे. आज वांद्रे पश्चिम विधानसभेचे भाजपा अध्यक्ष किशोर पुनवत, वॉर्ड अध्यक्ष देवयानी वैद्य यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी हे स्वाक्षरी अभियान राबवले. या अभियानाला कोळी बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अशी माहिती किशोर पुनवत यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!