Share

मोठी बातमी! सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरच्या अपघाताचे कारण आले समोर

Published On: 

नवी दिल्ली: तामिळनाडूमधील कुन्नूर येथे झालेल्या भीषण अपघातात भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत (CDS Gen. Bipin Rawat) यांच्यासह १४ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेने देशासह जगाला हादरवलं. त्यानंतर हा अपघात कसा झाला, या सर्वांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्यानंतर या आपघाताप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.

बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताची (Helicopter Accident) प्राथमिक चौकशीचा अहवाल समोर आला आहे. या प्रकरणी वायुदलाने दुर्घटनेच्या तपासासाठी कोर्ट ऑफ एन्क्वायरीचे आदेश दिले होते. ८ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या Mi-17 V5 अपघाताच्या चौकशीच्या ट्राय-सर्व्हिसेस कोर्टाने आपले प्राथमिक निष्कर्ष सादर केले आहेत. चौकशी पथकाने फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरचे विश्लेषण केले आहे.

या चौकशी तसेच विश्लेषणातून महत्वाची माहिती समोर आली आहे. हेलिकॉप्टरमध्ये कोणत्याही प्रकारचे यांत्रिक बिघाड, तोडफोड किंवा निष्काळजीपणा हे अपघाताचे कारण नाही, असं कोर्ट ऑफ इन्क्वायरीने स्पष्ट केले आहे. खोऱ्यातील हवामानात अनपेक्षित बदल झाल्यामुळे ढगांनी प्रवेश केल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे चौकशीतून समोर आले आहे.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!