मुंबई : गेल्या दोन दिवसांपूर्वी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यानंतर पुढे आता हा मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते दिल्ली दौऱ्यावर जाणार होते. मात्र फडणवीसांचा अचानक दिल्ली दौरा रद्द झाला. मात्र आता पुन्हा एकदा माध्यमांना गुंगारा देत मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी पुन्हा दिल्ली गाठली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाचवेळा दिल्ली दौरा केला आहे.
यावेळीच मुख्यमंत्री शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द झाला असे आधी सांगण्यात आले होते. मात्र बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना झाल्याचे माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. रात्री उशिरापर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात तासभर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मंत्रीमंडळ विस्तार आणि 1 ऑगस्टच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी या दोन्ही मुद्द्यांवर नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते आहे. रात्री साडेतीनच्या सुमारास शिंदे दिल्लीतून मुंबईत परतले आहेत.
दरम्यान , दुसरीकडे शिंदेनंतर आता भाजप नेते गिरीश महाजन आणि शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार हे दिल्लीत पोहोचले आहेत. सत्तार आणि महाजन हे चांगलं मंत्रिपद मिळावं म्हणून लॉबिंग करत असल्याचं सांगितलं जात आहे. महाजन यांनी तर काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असून त्यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar : आमच्या सरकारमध्ये पाच नाही, सातजण होते; अजित पवारांनी घेतला फडणवीसांच्या टीकेचा समाचार
- Cabinet expansion | राज्यातील नेत्यांची दिल्ली वारी सुरूच; महाजन, सत्तार घेणार अमित शहांची भेट
- Eknath Shinde : आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनंतर आता एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर
- Ajit Pawar | चहावाला पंतप्रधान, रिक्षावाला मुख्यमंत्री तर टोपलीवालीचा मुलगा… – अजित पवार
- Vidhya chavan | भाजपच्या तब्बल ११६ खासदारांविरोधात गुन्हे दाखल; विद्या चव्हाण यांची धक्कादायक माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

