चंद्रपुर : विरोधी पक्षनेते अजित पवार हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी कारण्यासाठी आज विदर्भ दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यावेळी त्यांनी चंद्रपुरातील अपक्ष आमदाराच्या निवासस्थानी भेट दिली. अजित पवार हे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी गेले होते. जोरगेवार यांच्या कुटुंबाकडून त्यांचे स्वागत आणि आदरातिथ्य करण्यात आले. तसेच त्यांनी जोरगेवार यांच्या कुटुंबीयांशी मनमोकळेपणाने संवाद देखील साधला. त्यावेळी त्यांनी मिश्कीलपणे केलेलं एक विधान सध्या राज्यभर गाजत आहे.
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांच्या आईच्या नावाने ‘अम्मा टिफिन’ असा एक आगळा वेगळा उपक्रम सुरु केला आहे. हा उपक्रम खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरु केला असल्याचे जोरगेवार यांनी सांगितले. या उपक्रमाची पाहणी अजित पवार यांनी केली. या भेटीदरम्यान जोरगेवार यांच्या मातोश्रींशी संवाद साधत असताना अजित पवार म्हणाले कि, “चहावाला पंतप्रधान बनू शकतो, रिक्षावाला मुख्यमंत्री बनू शकतो तर मग टोपलीवाल्याचा मुलगा मंत्री का बनू शकत नाही?”. तर अजित पवारांच्या या विधानावर एकच हशा पिकला.
महत्वाच्या बातम्या:
- Vidhya chavan | भाजपच्या तब्बल ११६ खासदारांविरोधात गुन्हे दाखल; विद्या चव्हाण यांची धक्कादायक माहिती
- Prakash Ambedkar | “ओबीसींना फसवण्याचं राजकारण अजूनही सुरूच” ; प्रकाश आंबेडकर आक्रमक!
- Nilesh Rane | “उद्धव ठाकरेंना लॉलीपॉप चिन्ह द्या, धनुष्यबाण शोभणारं नाही”; निलेश राणेंची खोचक टीका
- Jayant Patil | “दिल्ली वाऱ्या व अंतर्गत मतभेदातून जर्जर…” ; OBC आरक्षणावरुन जयंत पाटलांचे शिंदे सरकारवर टीकास्त्र
- Ramdas Athawale | “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्या पक्षात आले तर…”; रामदास आठवलेंचं अजब विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

