Share

Eknath Shinde : आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनंतर आता एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर

Published On: 

मुंबई : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले. मात्र शिवसेना पक्षात मोठी फूट पडली. आता शिवसेनेचे २ गट पडले आहेत. जवळपास ४० आमदार, १२ खासदार आणि अनेक नगरसेवक, पदाधिकारी यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले. मात्र दोन्ही गटातील वाद आता न्यायालयात सुरु आहेत. तसेच शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले आहेत.

याआधी शिवसेनेचे दादा भुसे आणि सुहास कांदे हे निष्ठावंत शिवसैनिक शिंदे गटात सामील झाल्यानंतर नाशिकमध्ये शिवसेना दुबळी झाल्याचे चित्र आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत त्यानंतर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दौरा केला. आदित्य ठाकरे यांनी तर तिन्ही बंडखोरांवर चांगलीच आगपाखड केली. त्यामुळे दादा भुसे आणि सुहास कांदे यांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट मालेगावात येणार आहेत. दरम्यान या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे भूमिपूजन, उदघाटन आणि विशेष जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री आज सायंकाळी 4 वाजता मुंबई येथील शासकीय निवासस्थानाहून नाशिक मार्गे मालेगावकडे रवाना होणार आहेत. त्यानंतर रात्री 10 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांचं मालेगाव शासकीय विश्रामगृहावर आगमन होईल. रात्री येथेच त्यांच्या मुक्काम असेल. 30 जुलै रोजी सकाळी 10 वाजेपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करण्यास सुरुवात करतील. शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच 30 जुलै आणि 31 जुलै रोजी मालेगाव तसेच संभाजीनगरचा दौरा करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!