Cabinet expansion | मुंबई : गेल्या दोन दिवसांपूर्वी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यानंतर पुढे आता हा मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते दिल्ली दौऱ्यावर जाणार होते. मात्र फडणवीसांचा अचानक दिल्ली दौरा रद्द झाला. यानंतर या दौऱ्यांमध्ये मंत्र्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. शिंदेनंतर आता भाजप नेते गिरीश महाजन आणि शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार हे दिल्लीत पोहोचले आहेत.
जवळपास महिना होत आलं तरी अजून राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. एवढेच काय देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं असलं तरी फडणवीस यांना अजूनही कोणतंच खातं देण्यात आलेलं नाही. तर, दुसरीकडे गिरीश महाजन आणि अब्दुल सत्तार हे दिल्लीत पोहोचले आहेत. सत्तार आणि महाजन हे चांगलं मंत्रिपद मिळावं म्हणून लॉबिंग करत असल्याचं सांगितलं जात आहे. महाजन यांनी तर काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले आहेत. याआधी शिवसेनेचे दादा भुसे आणि सुहास कांदे हे निष्ठावंत शिवसैनिक शिंदे गटात सामील झाल्यानंतर नाशिकमध्ये शिवसेना दुबळी झाल्याचे चित्र आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत त्यानंतर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दौरा केला. आदित्य ठाकरे यांनी तर तिन्ही बंडखोरांवर चांगलीच आगपाखड केली. त्यामुळे दादा भुसे आणि सुहास कांदे यांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट मालेगावात येणार आहेत. तसेच शिंदे प्रथमच 30 जुलै आणि 31 जुलै रोजी मालेगाव तसेच संभाजीनगरचा दौरा करणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde : आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनंतर आता एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर
- Ajit Pawar | चहावाला पंतप्रधान, रिक्षावाला मुख्यमंत्री तर टोपलीवालीचा मुलगा… – अजित पवार
- Vidhya chavan | भाजपच्या तब्बल ११६ खासदारांविरोधात गुन्हे दाखल; विद्या चव्हाण यांची धक्कादायक माहिती
- Prakash Ambedkar | “ओबीसींना फसवण्याचं राजकारण अजूनही सुरूच” ; प्रकाश आंबेडकर आक्रमक!
- Nilesh Rane | “उद्धव ठाकरेंना लॉलीपॉप चिन्ह द्या, धनुष्यबाण शोभणारं नाही”; निलेश राणेंची खोचक टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

