🕒 1 min read
पुणे: ओबीसी राजकीय आरक्षणाचा महाविकास आघाडी सरकारने काढलेला आध्यादेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा टीकेची झोड उठली आहे. महाविकास आघाडी सरकारवर सध्या सर्वच स्तरातून टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, गेल्या दोन वर्षात महाआघाडी सरकारने कोर्टात जिंकली अशी एक तरी केस दाखवावी. मराठा आराक्षण (Maratha Reservation), ओबीसी आरक्षण (OBC Reservation), ग्रामपंचायत सरपंच, परमबीरसिंह (Parambir singh) अशा सर्वच विषयात महाविकास आघाडी सरकार कोर्टात हरले आहे. पण खड्ड्यात जाऊन देखील या सरकारला काहीच फरक पडत नाही. कारण त्यांना फक्त वसूली करायची आहे, अशी टीका भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
ओबीसी आरक्षणावरून चंद्रकांत पाटील यांनी चांगलाच निशाणा साधला आहे. ओबीसी समाजाला शांत करण्यासाठी आध्यादेश काढून लॉलीपॉप देण्याचा प्रयत्न केला. ओबीसी समाजाची फसवणूक राज्य सरकारने केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे खूप मोठे संकट निर्माण झाले आहे. आता नगरपरिषद, महापालिकांच्या नियोजित निवडणुका कोणत्या पद्धतीने होणार, रद्द होणार की जिल्हा परिषदेच्या झाल्या तशा ओबीसी आरक्षणशिवायच होणार, हे आयोगाने स्पष्ट करावे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘उपोषण करा नाहीतर मरा, सरकारला कुठलंही सोयरसुतक नाही’
- राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भातखळकरांचे प्रत्युत्तर; म्हणाले,’सत्तेसाठी हिंदुत्वाचे नेसण सोडणाऱ्यांना…’
- …म्हणून एसटी संप चिघळला; माजी मंत्र्याचा राज्यसरकारवर आरोप
- ‘कामावर हजर असलेल्यांनाच पगार मिळणार’
- ‘केंद्र सरकारने आरक्षणाचे प्रस्ताव सभागृहात मांडून त्यांना न्याय देण्याची ठाम भूमिका घ्यावी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
