Share

‘त्या’ दुर्घटने प्रकरणी आदित्य ठाकरे राजीनामा द्या- नितेश राणे

Published On: 

मुंबई : काही दिवसांपूर्वी वरळीच्या गणपतराव जाधव मार्गावरील बीडीडी चाळ क्रमांक ३ मध्ये सिलिंडर स्फोट झाला होता. या घटनेत चार जण होरपळले. यातील काही जणांना नायर तर काही लोकांना कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान मंगेश पुरी या चार महिन्याच्या बालकाचा १ डिसें. रोजी मृत्यू झाला. त्यानंतर आनंद पुरी यांचा ४ डिसें. तर विद्या पुरी यांचा काल मृत्यू झाला होता. तसेच या दुर्घटनेत एक पाच वर्षाचा मुलगा १५ ते २० टक्के होरपळला आहे. दरम्यान, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने वरळीत हळहळ व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांनी विधानसभेचे आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात नितेश राणे यांनी एक ट्विट केले असून ते म्हणले आहेत की,’वरळीत सिलिंडर स्फोट झाला होता. या दुर्घटनेतील तिसऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला. आधी लहान मुलाचा. नंतर त्याच्या वडिलांचा आणि आता त्याच्या आईचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. ही अत्यंत दुर्देवी आणि वेदनादायी घटना आहे. स्थानिक आमदार आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे,’ अशी मागणी राणेंनी केली आहे.

दरम्यान, या घटनेप्रकरणी संताप व्यक्त करत भाजप नेते आशिष शेलार म्हणाले की,’वरळी दुर्घटनेतील बालकावर नायर रुग्णालयात वेळीच उपचार झाले नाही,त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तसेच मुंबईच्या महापौर घटनेनंतर ७२ तासांनी रुग्णालयात पोहचल्या, असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!