Share

Cholesterol Control | ‘या’ गोष्टींचे सेवन करून नियंत्रणात ठेवता येऊ शकते चांगले कोलेस्ट्रॉल

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: हृदय (Heart) हा शरीराचा प्रमुख भाग आहे. हृदय निरोगी असल्यास शरीर तंदुरुस्त राहते. हृदय निरोगी ठेवण्यासाठी शरीरामध्ये चांगले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात (Cholesterol Control) राहणे खूप आवश्यक असते. कारण शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास हृदयाशी संबंधित आजार निर्माण होण्याचा धोका जास्त असतो. शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याचे अनेक कारणे असू शकतात. यामध्ये बदलती जीवनशैली, योग्य आहार इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. अशा परिस्थितीत तुम्ही कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी काही अन्नपदार्थांचे सेवन करू शकतात. हे अन्नपदार्थ कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते आणि त्याचबरोबर शरीर निरोगी ठेवण्यासाठी देखील मदत करते. पुढील गोष्टींचा आपल्या आहारात समावेश केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहू शकतो.

मासे

माशांचे सेवन करणे हे शरीरासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. हे अॅसिड शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. हृदय निरोगी ठेवण्यासाठी तळलेले मासे खाऊ नका, तर वाफवलेले मासे खा. कारण तळलेले मासे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल पातळी वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

डार्क चॉकलेट

चॉकलेट हे बहुतेक लोकांच्या आवडीचे असते. त्याचबरोबर डार्क चॉकलेटही अनेक लोकांना आवडते. डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते. कारण यामध्ये असलेले कोको शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. त्याचबरोबर डार्क चॉकलेटच्या सेवनाने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका देखील कमी होतो. डार्क चॉकलेट खाल्ल्याने तणावाची पातळी देखील नियंत्रणात राहते.

लसूण

लसूण हे आपल्या शरीरासाठी कुठल्याही औषधीपेक्षा कमी नाही. कारण यामध्ये उपलब्ध असलेले अँटीअँक्सीडेंट शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. लसणाच्या नियमित सेवनाने रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो आणि त्याचबरोबर शरीरात कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. परिणामी हृदयाशी संबंधित आजाराचा धोका कमी होतो.

ओट्स

ओट्स आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत करू शकतात. ओट्स नियमित सेवनाने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. परिणामी हृदयासंबंधी समस्या कमी होतात. त्याचबरोबर ओट्सच्या नियमित सेवनाने वजन कमी होण्यास देखील मदत होऊ शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!