मुंबई : गावगुंड मोदी प्रकरणानंतर पुन्हा एका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं ,असं नाना पटोले म्हणाले आहेत. यावरुन भाजपाकडून राज्यभरात आंदोलनं केली जात आहे. भाजप नेते पटोलेंवर हल्लाबोल करत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रसचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी नाना पटोले यांचे कान टोचले आहे आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांचे उदाहरण देत छगन भुजबळ यांनी पटोलेंवर निशाणा साधला. बाळासाहेब सांगायचे पंतप्रधानांचा मान राखलाच गेला पाहीजे. केंद्रीय मंत्री असताना शरद पवारांनी मुख्यमंत्र्याचा मान राखला होता, याची आठवण छगन भुजबळ यांनी करुन दिली.
छगन भुजबळ म्हणाले, “इंदिरा गांधी पंतप्रधान असताना शिवसेना आणि त्यांचे जोरात भांडण व्हायचे. पण बाळासाहेबांनी सांगितले होते की त्यांचा कुठेही अपमान होता कामा नये, राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांचा मान आपण राखला पाहीजे. शरद पवार केंद्रात मंत्री असताना एका कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख थोडे उशीरा आले होते. ते व्यासपीठावर आल्याबरोबर शरद पवार उठून उभे राहीले. कारण तो त्या खुर्चीचा मान आहे.”
महत्वाच्या बातम्या :
- ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणांच्या गजरात औरंगाबादेत झाले छत्रपतींचे आगमन..!
- “…त्यामुळेच पटोलेंना महाराष्ट्राचे पप्पू म्हणून नामाभिमान देण्यात आलाय”
- “पंतप्रधानांचा अवमान करणाऱ्या, बुरसटलेल्या विचारांच्या नाना पटोलेंचे शुद्धीकरण करणे गरजेचे”
- डेव्हिड वॉर्नरने केलेल्या श्रीवल्ली डान्सस्टेप्सवर, अल्लू अर्जूनने केली कमेंट
- वामिकाचे फोटो व्हायरल होताच विराटने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
