Share

वामिकाचे फोटो व्हायरल होताच विराटने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला..

Published On: 

नवी दिल्ली: विराट कोहली(Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांची लाडकी लेक वामिका ( Vamika)अखेर टीव्हीवर झळकलीच. चाहते तसेच पत्रकार तिच्या एका झलकसाठी तरसत असताना वामिका अखेर दक्षिण आफ्रिकाविरुद्ध भारत यांच्यातील तिसरा वनडे सामना चालू असताना टीव्हीवर झळकून आली. मात्र फोटो व्हायरल झाल्यानंतर विराटने आता पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

विराट कोहलीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर म्हटले आहे की, “नमस्कार मित्रांनो! आमच्या मुलीचे फोटो काल स्टेडियममध्ये कॅप्चर करण्यात आले. आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर ते शेअर केले गेले. याबाबत आम्हाला आज जाणीव झाली. ज्यावेळी आमच्या मुलीचे फोटो कॅप्चर करण्यात आले, तेव्हा आमचे कॅमेराकडे लक्ष नव्हते. मात्र वामिकाच्या फोटोबाबत आमची अगोदर जी भूमिका होती, तीच आताही आहे. त्यामुळे वामिकाचे फोटो प्रकाशित करण्यात येऊ नयेत.” असे आवाहन विराट कोहलीने केले आहे.

दरम्यान  दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील तिसरा वनडे सामना केपटाऊन येथे सुरु होता. २८८ धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने अर्धशतकासह संघाचा डाव सावरला. त्याने वनडे कारकिर्दीतील ६४ वे अर्धशतक झळकावले. त्याच्या या खेळीनंतर VVIP गॅलरीतून सामन्याचा आनंद घेणाऱ्या अनुष्का शर्माकडे कॅमेरा वळला. आणि याचक्षणी वामिकाची पहिली झलक चाहत्यांच्या समोर आली. कोहलीने त्याचे अर्धशतक त्याची लाडकी लेक वामिकाला समर्पित केले. त्याचे अर्धशतक सेलिब्रेशन करतानाच वामिकाचा चेहरा सर्वांसमोर आल्याचे पाहायला मिळाले.

कोहली आणि अनुष्का यांनी वामिकासोबतचे अनेक फोटो आतापर्यंत सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पण तिचा चेहरा सर्वांना दिसणार नाही याची काळजी दोघांनीही घेतली होती. वामिकाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तिचा चेहरा समोर येऊ नये, या हेतूने त्यांनी वामिकाला कॅमेरापासून दूरच ठेवले होते. मात्र कालच्या सामन्यात कोहलीच्या अर्धशतकानंतर कॅमेरा अनुष्का वामिकाकडे फिरला अन् पहिल्यांदाच अनुष्कासोबत वामिकाचा चेहरा सर्वांना दिसला.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!