दुबई : यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईच्या टीमला संघर्ष करावा लागत आहे. आतापर्यंत खेळलेल्या 3 मॅचपैकी 2 मॅचमध्ये चेन्नईचा पराभव झाला होता. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नई शेवटच्या क्रमांकावर आहे. सुरेश रैना (Suresh Raina) आणि हरभजन सिंग हे दोन दिग्गज खेळाडू नसल्यामुळे चेन्नईच्या टीममध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याचं चित्र आहे.
काल झालेल्या सामन्यांमध्ये चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध सन राईस हैद्राबाद या सामन्यात चेन्नईचा आयपीएल मधील सलग तिसरा पराभव आहे. या सामन्यामध्ये सनरायझर्स हैद्राबादने चेन्नई सुपर किंग्जचा 7 धावांनी पराभव केला. हैद्राबादने विजयासाठी दिलेले 165 धावांचे आव्हान चेन्नई समोर होते परंतु हा भार चेन्नई सुपर किंग्सला पेलवला नाही आणि धोनीचा संघ 20 षटकात 5 बाद 157 धावा करू शकला. दरम्यान, आयपीएलमधील हैद्राबादचा यंदाच्या हंगामातील हा दुसरा विजय आहे, तर चेन्नईचा सलग तिसरा पराभव.
चेन्नईचा हा या स्पर्धेतील सलग तिसरा पराभव ठरला. त्यामुळे चेन्नईच्या पराभवाची हॅट्रिक झाल्याचे पाहायला मिळाले. चेन्नईचा संघ आतापर्यंत चार सामने खेळला आहे आणि त्यांना तीन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे चेन्नईचा संघ या गुणतालिकेत तळाला, म्हणजेच आठव्या स्थानावर असल्याचेच पाहायला मिळत आहे.
- शिवसेनेचा वचननामा ही तर जनतेची फसवणूक : आपची पोलिसात तक्रार
- #हाथरस प्रकरणी अखेर योगी आदित्यनाथ यांनी सोडले मौन, म्हणाले…
- मार्कंडेय काटजूंचे वादग्रस्त वक्तव्य; हाथरस प्रकरणाचं फोडलं बेरोजगारीवर खापर
- हाथरस प्रकरणातील पीडितेच्या परिवारास महाराष्ट्र शासनाने २५ लाखांची आर्थिक मदत करावी : गजभिये
- दिलासादायक : सणासुदीच्या दिवसांत २०० विशेष रेल्वे चालवल्या जाणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

