🕒 1 min read
नवी दिल्ली- सणासुदीच्या काळात प्रवास करणा-या प्रवाशांच्या सोयीसाठी 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान रेल्वेकडून २०० विशेष गाड्या चालवण्याची योजना आखली जात असल्याची माहिती रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही के. यादव यांनी दिली आहे. ते काल नवी दिल्लीत दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते.
या बैठकीत सर्व झोनच्या महाव्यवस्थापकाना अहवाल देण्यास सांगण्यात आले असून त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत कोणत्या गाड्यांची सुरूवात होईल याचा निर्णय घेतला जाणार आहे.सर्व विभागीय व्यवस्थापकांना आपापल्या भागातील स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून करोनास्थितीचा आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे.
तूर्त दोनशे गाड्या सुरू करण्याचे नियोजन आम्ही केले आहे, प्रत्यक्षात कदाचित यापेक्षा अधिक गाड्याही सुरू होऊ शकतात. राज्य सरकारांच्या गरजेनुसार प्रवासी वाहतुकीचा दैनंदिन आढावा घेण्याचा निर्णयही रेल्वेने घेतल्याची माहिती यादव यांनी दिली. जेथे गरज असेल, तेथे प्रवासी गाड्या सुरू केल्या जातील, असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- हरभजन-रैनाला चेन्नई जोरदार दणका देण्याच्या तयारीत
- शिवसेनेचा वचननामा ही तर जनतेची फसवणूक : आपची पोलिसात तक्रार
- #हाथरस प्रकरणी अखेर योगी आदित्यनाथ यांनी सोडले मौन, म्हणाले…
- मार्कंडेय काटजूंचे वादग्रस्त वक्तव्य; हाथरस प्रकरणाचं फोडलं बेरोजगारीवर खापर
- हाथरस प्रकरणातील पीडितेच्या परिवारास महाराष्ट्र शासनाने २५ लाखांची आर्थिक मदत करावी : गजभिये


