Share

‘चिन्ना थाला’ला चेन्नई सुपर किंग्सने केले अलविदा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्सने त्यांचं चिन्ना थाला असलेल्या सुरेश रैनाला संघात पुन्हा घेतले नव्हते. तसेच इतर संघांनीही रैनाच्या रस दाखवला नाही ज्यामुळे तो अनसोल्ड राहिला आहे. चेन्नई सुपर किंग्सने रैनाला रिटेन केले नाही. दशकांहून अधिक काळ चेन्नईचा भाग असलेला रैना यावर्षी स्पर्धेचा भाग नसणार आहे. चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत रैनाला अलविदा केले आहे.

सुरेश रैना २००८ पासून चेन्नई संघाचा भाग होता. फक्त २०१६ आणि २०१७ मध्ये संघ बॅन झाला असताना त्याने गुजरात लायन्सचे नेतृत्व केले होते. मात्र २०१८ मध्ये चेन्नईने त्याला पुन्हा संघात आणले होते. चेन्नईने रैनासाठी एक भावनिक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात २००८ पासूनचे रैना आणि चेन्नईच्या आठवणी आहेत. चेन्नईचे चाहते अजूनही रैनाच्या संघात नसल्याने दुखी आणि भावनिक आहेत.

https://www.instagram.com/tv/CaOtWbel954/?utm_source=ig_web_copy_link

सुरेश रैनाने २०५ सामन्यांमध्ये ५५२८ धावा करत आयपीएल इतिहासात चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. यापैकी ४६८७ धावा चेन्नईसाठी त्याच्या ११ वर्षांच्या कारकिर्दीत आल्या आहेत. तो CSK चा कर्णधार एमएस धोनीच्या पुढे सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला. मात्र इतके वर्ष सोबत असूनही चेन्नईने चिन्ना थाला रैनाला शेवटी रामराम ठोकला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!