Share

कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेले राजस्थानचे मुख्यमंत्री गहलोत यांना कोरोना

Published On: 

जयपूर : राजस्थानमध्ये कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मात्र, त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून आलेली नाही. कोरोनाच्या प्रोटोकॉलचे पालन करत ते आयसोलेट झाले आहेत.

गहलोत यांच्या पत्नीची कोरोणा चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांनी स्वत:ची चाचणी करुन घेतली होती. या संदर्भात मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. गहलोत यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस आधची घेतले आहेत. यातील पहिला डोस त्यांनी फेब्रुवारी महिन्यात घेतला होता. तर दुसरा डोस त्यांनी मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच घेतला होता. मात्र, या दोन्ही डोसमुळेच त्यांना कोरोनाचे कोणतेही लक्षण दिसून आले नाही.

कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्यानंतर १०० टक्के कोरोना होणार नाही अशी खात्री नसली तरी, कोरोना झाला तरी तुमची कोरोनाशी लढण्याची क्षमता वाढते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळेच अशोक गहलोत यांना कोरोना झाल्यानंतरही त्यांच्यामध्ये गंभीर लक्षणे दिसून आलेली नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!