मुंबई : क्रूज पार्टीवरील छापा हा बनावट असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. ‘ज्या दिवशी क्रूझवर एनसीबीने छापे टाकले त्यावेळी समीर वानखेडे यांनी ८ ते १० लोकांना ताब्यात घेतले असे म्हटले होते. हे बेजबाबदार विधान आहे. एकूण अकरा लोकांना ताब्यात घेतले होते आणि नंतर आठ लोकांना ताब्यात घेतल्याच्या बातम्या आल्या,’ असा गौप्यस्फोट मलिक यांनी केला आहे.
‘एनसीबीने ताब्यात घेतलेल्या ११ जणांमध्ये रिषभ सचदेव, प्रतीक गाभा आणि आमिर फर्निचरवाला या तिघांना सोडण्यात आलं. या तिघांना का सोडण्यात आलं?, रिषभ सचदेव हा भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांचे नातेवाईक आहेत,’ असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानवर टाकलेली धाड ही बनावट आणि नियोजित होती. तब्बल तेराशे लोकांच्या जहाजावर ११ जणांनाच ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी तिघांना का सोडण्यात आले असा सवाल नवाब मलिक यांनी केला. शिवाय मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे कॉल रेकॉर्ड तपासणी करावी अशी मागणी केली आहे. ‘दिल्ली ते मुंबईतील भाजप नेत्यांनी फोन केले. या सगळ्या कटात भाजपचे नेते सहभागी असल्यानं त्यांच्या नातेवाईकांना सोडलं. समीर वानखेडे यांना भाजप नेत्यांनी फोन केल्यामुळे त्यांनी तिघांना सोडून दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- नियम मोडून तुळजाभवानीचे दर्शन, भाजपच्या आचार्य तुषार भोसलेंविरुद्ध गुन्हा दाखल
- ‘फडणवीसांना निमंत्रण नाही, हिसाब तो जरूर होगा!’, नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा
- ‘उद्धव ठाकरेंसोबत व्यासपीठावर बसणे ही चांगली गोष्ट, हा योग अनेक वर्षांनी येतोय’ नारायण राणेंची प्रतिक्रिया
- ‘उद्घाटनाच्या वेळेला कोणतेही राजकारण करणार नाही’, नारायण राणेंकडून तलवार म्यान
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंनी पुन्हा कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडवले’, भाजपची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

