Share

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला झटका

Published On: 

🕒 1 min read

पिंपरी चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका या महाराष्ट्र राज्यातील दोन अत्यंत महत्वाच्या  महानगरपालिका आहेत. पुणे महानगरपालिका ही महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी महानगरपालिका आहे तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ही एक श्रीमंत महानगरपालिका आहे. २०१७ मध्ये या दोन्ही महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. २०१७ च्या निवडणुकीपर्यंत या दोन्ही महानगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. याच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला आत जोरदार झटका बसला आहे.

भाजपचे नगसेवक वसंत बोराटे यांनी पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून पदाचा राजीनामा दिला आहे. वसंत बोराटे हे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक दोनचे प्रतिनिधित्व करतात. मोशी-जाधववाडी या प्रभातील ते नगरसेवक आहेत. भारतीय जनता पक्षातील एक शांत आणि सुसंकृत चेहरा अशी त्यांची ओळख होती; मात्र पिंपरी चिंचवड भाजप मधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षातील राजकारणाला कंटाळून आणि विकासकामात कोणीच मदत करत नसल्याचे दुःख होत आहे आणि हेच मुद्दे लक्षात ठेवून मी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे असं त्यांनी सविस्तर बोलताना सांगितले.

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी वसंत बोराटे यांचा राजकारणात भरपूर वापर करून घेत होते मात्र त्यांना मोबदल्यात कुठलेच पद मिळत नसल्यामुळे सुद्धा ते नाराज होते आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिला आहे. वसंत बोराटे हे भारतीय जनता पक्ष सोडल्यावर बहुतेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करू शकतात; मात्र मी अजून आगामी राजकारणाची दिशा ठरवली नाहीये असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!