Share

‘त्यांचा नेम चुकला आणि बाण धनुष्यातचं घुसला…’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेचे दिग्गज नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली आहे. वर्षा राऊत यांनी पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली आहे. यानंतर राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे.

याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, भाजपमधून नुकतंच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आदी नेत्यांना ईडीने नोटीस बजावल्याचं गेल्या काही वर्षात दिसून येतंय. आता हा ईडीचा वाद आणखी चिघळल्याचं दिसून येत आहे.

एनएआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृतानुसार, ईडीने पीएमसी बँक घोटाळ्यात प्रवीण राऊत यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणामध्ये प्रवीण राऊत यांच्याकडे 72 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा दावा ईडीने केला आहे. हा व्यवहार मनी लाँड्रिंग कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हणत ही संपत्ती ईडीने जोडली आहे. दरम्यान, ही मालमत्ता ईडीने जप्त केल्याचं वृत्त टीव्ही ९ मराठीने दिले आहे.

हे प्रकरण आता शिवसेनेच्या अंगलट आल्याचा दावा भाजप नेत्याने केले आहे. शिवसेनेचे नेते व आमदार रवींद्र वायकर यांनी पीएमसी बँक घोटाळ्यावरून भाजप नेत्यांची कोंडी करण्याचा प्रयतन केला होता. यासाठी त्यांनी चौकशीची मागणी देखील केली, मात्र आता या प्रकरणाचा संबंध शिवसेनेच्या दिग्गज नेत्याच्या कुटुंबीयांपर्यंत गेल्याने शिवसेनेवरच डाव उलटल्याची टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

‘भाजपावर शरसंधान केल्याचा आव आणत रवींद्र वायकर यांनी PMC बँक घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. घोटाळ्यात राजकीय नेते असल्याचा त्यांचा कयास अगदी योग्य होता, फक्त त्यांचा नेम चुकला आणि बाण धनुष्यात घुसला…’ असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!