Share

अमानुषतेचा कळस : अर्धनग्नकरुन ट्रकचालकाला मारहाण

Published On: 

नागपूर : गोदामातून माल घेवून तो संबंधीत स्थळी न पोहोचविता या कामासाठी दिलेला अ‍ॅडव्हास परस्पर खर्च करणाऱ्या चालकाला ट्रक मालकाकडून अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांनी दखल घेत आरोपी अखिल पोहनकर व त्याचा साथीदार अमित ठाकरे (रा.दत्तवाडी) याला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडधामनातील आंध्रा-कर्नाटक रोडलाइन्स या ट्रान्सपोर्ट एजन्सीकडे विक्की हा चालक आहे. काही दिवसांपूर्वी या एजन्सीने विक्की याला ट्रकमधील साहित्य थिरुअनंतपुरम येथे पोहोचविण्यास सांगितले. यासाठी विक्की याला ३५ हजार रुपये दिले. परंतु विक्की हा ट्रक घेऊन थिरुअनंतपुरमला गेला नाही. तो नागपुरातच होता. त्याने सर्व पैसे खर्च केले. याशिवाय ट्रकमधील १२ हजार रुपयांचे डिझेलही परस्पर विकले. त्यानंतर विक्की हा बेपत्ता झाला.

शनिवारी त्याला अखिल व अमित या दोघांनी त्याला पकडले. एजन्सीच्या कार्यालयात आणून त्याला अर्धनग्न केले. पंख्याला लटकवून विक्की याला अमानुष मारहाण केली. या घटनेचा रविवारी व्हीडिओ व्हायरला झाला. पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी या घटनेची गंभीर दखल घेत मारहाण करणाऱ्यांविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार पोहनकर हा युवा सेनेचा तालुका प्रमुख आहे. हेराफेरी करणाऱ्या विक्की वर कायदेशीर कारवाई करता आली असती मात्र अखिलने कायदाच हातात घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!