Share

निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणतीही आशा नाही : राज ठाकरे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- ईलेक्टॉनिक मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान घेण्याच्या निर्णयाबाबत निवडणूक आयोग तसंच सर्वोच्च न्यायालयाकडून कोणतीही आशा नसल्याची प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

ईलेक्टॉनिक मतदान यंत्रविरोधात येत्या ९ ऑगस्ट रोजी मनसेच्यावतीनं आंदोलन करण्यात येणार आहे, त्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी काल तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांची भेट घेतली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बँनर्जी यांना ईव्हीएमविरोधी आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं असल्याचंही ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

या महिन्याच्या सुरूवातीस देखील राज यांनी याच मुद्यावरून यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांची देखील दिल्लीत भेट घेतली होती. ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपर आणा अशी मागणी राज ठाकरेंनी या अगोदर केलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर जे आंदोलन होणार आहे, त्याची तयारी आता राज ठाकरे यांनी सुरु केली असल्याचे दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या 

आता ‘ठाकरे’ चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सत्ता आल्यानंतर यात्रा काढायची होती; आदित्य ठाकरेंवर अमोल कोल्हेंची टीका

लोकसभेच्या ३७० मतदारसंघात ईव्हीएममुळे घोळ : राज ठाकरे

मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून ही यात्रा काढली नाही – आदित्य ठाकरे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!