टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कॉंग्रेस राष्ट्रवादीचे नेते भाजपात प्रवेश केला आहे. तर मुंबईतील गरवारे क्लब येथे ही मेगा भरती झाली आहे. या भरतीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे, वैभव पिचड, संदीप नाईक तर काँग्रेसचे कालिदास कोळंबकर. तसेच राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे.
या पक्ष प्रवेशावेळी गरवारे क्लब येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह खा. रणजितसिंह निंबाळकर, मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार आणि विनोद तावडे आदींसह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते. प्रवेश करणाऱ्या नेत्यांबरोबर त्यांच्या समर्थकांचीही मोठी गर्दी होती. त्यामुळे भाजपची ही मेगा भरती ठरली आहे.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षात प्रवेश करत असलेल्या नेत्यांचे स्वागत केले. ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचा आता परिवार विस्तार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिनिधित्वामुळे देशातल्या सामान्य माणसाला ही वाटल की देशात आता परिवर्तन होत आहे. केवळ घोषणा होत नसून त्याची अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे देश आता बलाढ्य देश म्हणून ओळखला जात आहे.भाजपात येणाऱ्या नेत्यांना आम्ही कोणताही धाक आणि प्रलोभन दाखवली नाही. तर ती स्वतः हून जनतेच्या इच्छेने भाजपात आली आहेत.
दरम्यान आमदार वैभव पिचड, शिवेंद्रसिंहराजे, संदीप नाईक तसेच काँग्रेसच्या कालिदास कोळंबकर यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा दिला होता. आज या नेत्यांनी ठरल्याप्रमाणे भाजपच्या व्यासपीठावर उपस्थिती लावली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

