अहमदाबाद – देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत असून रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडची कमतरता जाणवत आहे. परिणामी अनेक रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत आहे. अशातच रुग्णवाहिकेचा वापर केला नाही म्हणून कोविड रुग्णालयाने उपचारास दिलेल्या नकारामुळे एका महिला प्राध्यापकाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
इंद्राणी बॅनर्जी असे या महिला प्राध्यापिकेचे नाव असून या गुजरात केंद्रीय विद्यापीठात स्कूल ऑफ नॅनोसायन्सच्या प्रमुख होत्या. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता. त्यांच्या सहकारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांना उपचारासाठी अहमदाबाद कोविड रुग्णालयात नेलं. पण यावेळी रुग्णालयाने त्यांना योग्य रुग्णवाहिकेतून आणण्यात आलं नसल्याचं सांगत उपचारास नकार दिला. अखेर वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचं निधन झालं.
विद्यार्थ्यांनी सांगितलं, की शुक्रवारी त्यांची ऑक्सिजन लेवल 90-92% पर्यंत होती. शुक्रवारी त्यांना गांधीनगरच्या एका सरकारी रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. रुग्णालय पूर्णपणे भरलेलं होतं, तिथे जागा शिल्लक नव्हती. यानंतर त्यांना जेव्हा खाजगी रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा तिथे देखील ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची कमी असल्याचे समोर आले. यानंतर त्यांच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी त्यांना खासगी वाहनात अहमदाबादच्या नगर निगम कोविड रुग्णालयात नेलं. मात्र, तिथे त्यांना तुम्ही रुग्णवाहिकेनं आला नाहीत, असं सांगत भर्ती करुन घेण्यास नकार देण्यात आला.
यानंतर त्यांना पुन्हा एकदा गांधीनगरच्या रुग्णालयात आणण्यात आलं. मात्र, तेव्हा त्यांची ऑक्सिजन लेवल 60% वर होती. त्यांच्या सहकाऱ्यांनी ही माहिती दिली. दोन वाजेपर्यंत गांधीनगर रुग्णालयात इंद्राणी यांच्यासाठी ऑक्सिजनची व्यवस्था केली गेली. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
महत्वाच्या बातम्या
- दररोज २५ हजार जणांना लस द्या, जालना; पालकमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश
- मराठवाड्याला अवकाळीचा फटका; नांदेडमध्ये शेतकऱ्याचा मृत्यू, दोन म्हशी दगावल्या
- आज रात्रीपासून राज्यात सर्वत्र संचारबंदी, नियमांचा भंग केल्यास होणार कठोर कारवाई
- कोरोनाचा कहर : उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान आज विविध राज्यांच्या राज्यपालांशी संवाद साधणार
- पहिला चेंडु टाकण्याआधिच हिटमॅनचा पाय मुरगळला; गोलंदाजी करतानाचा व्हिडीओ व्हायरल


