सोलापूर – विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आजही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाचा हा फेरा विदर्भ, मराठवाड्यात उद्या पर्यंत राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
या पावसामुळे उन्हाची काहिली काहीशी कमी झाली असून मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात तापमानात लक्षणीय घट झाली. मराठवाड्याच्या काही भागात तर विदर्भात तुरळक ठिकाणी तापमानात अल्पशी घट झाली आहे. काल ब्रह्मपुरी आणि जळगाव वगळता कुठेही 40 अंश सेल्सीअस पेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली नाही.
दरम्यान, काल राज्याच्या अनेक भागात कालही जोरदार पाऊस झाला. सोलापुरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक झाडं कोसळली; काही घरांवरील पत्रे उडून गेले. या पावसाने गहू, ज्वारी या पिकांसह फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. सातारा, नांदेड, बुलडाणा जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला.
महत्वाच्या बातम्या
- रुग्णवाहिकेतून न आल्यानं उपचारास रुग्णालयाचा नकार, ऑक्सिजनअभावी प्राध्यापिकेचा मृत्यू
- मराठवाड्याला अवकाळीचा फटका; नांदेडमध्ये शेतकऱ्याचा मृत्यू, दोन म्हशी दगावल्या
- आज रात्रीपासून राज्यात सर्वत्र संचारबंदी, नियमांचा भंग केल्यास होणार कठोर कारवाई
- कोरोनाचा कहर : उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान आज विविध राज्यांच्या राज्यपालांशी संवाद साधणार
- पहिला चेंडु टाकण्याआधिच हिटमॅनचा पाय मुरगळला; गोलंदाजी करतानाचा व्हिडीओ व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

