Share

पंजाबने BJP ला का नाकारले यावर चिंतन करायची गरज; संजय राऊतांची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई: काल (१० मार्च) पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागले. युपीत भाजपला प्रचंड मोठी आघाडी मिळत बहुमत प्राप्त झाले. मात्र पंजाबमध्ये त्यांना निराशादायक निकाल मिळाला. सोबतच काँग्रेसचीही पिछाडी झाली. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

“उत्तर प्रदेश निकालापेक्षा आम्ही पंजाब निकालाकडे अधिक गांभीर्याने बघतो. खरं तर नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील संपूर्ण भाजपने आपली ताकत लावली. मात्र तरीही पंजाबमध्ये भाजपला जेमतेम १ जागा मिळाली आहे. सीमेवरील राज्य आहे. संवेदनशील राज्य आहे. कायम अस्वस्थता असते. अशा ठिकाणी भाजपने निवडून येणं गरजेचं होतं. पण त्यांना पंजाब सारख्या राज्याने का नाकारले यावर भाजपला चिंतक करायची गरज आहे.”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

तसेच उत्तर प्रदेश असेल उत्तराखंड असेल त्यांचीच राज्य होती. त्यांनी ती राखली. त्यांचे आम्ही अभिनंदन करतो. मात्र उत्तराखंडचे मुख्यमंत्री पराभूत झाले. गोव्यात दोन उपमुख्यमंत्री पराभूत झाले. आनंद आहे तुम्ही जिंकलात. काल निवडणुका संपल्या आज कामावर लागले आहे. मात्र पंजाब हा पोरखेळ नाही. त्यामुळे पंजाबने भाजपला इतक्या वाईट पद्धतीने का नाकारले यावर सर्वांनी विचार करायला हवा. असेही राऊत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!