Share

“आणि सचिनने फिरकीच्या जादूगारचा जादू डिकोड केला” मास्टर ब्लास्टरच्या माजी कोचने सांगितला रंजक किस्सा

Published On: 

मुंबई: सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न यांच्यातील दिग्गज लढती क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलेली आहेत. 1992 मध्ये SCG येथे वॉर्नच्या कसोटी पदार्पणात प्रथमच हे दोन महान खेळाडू आमने सामने आले. १९९० दशकाच्या उत्तरार्धापर्यंत ही लढाई सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. शारजाह, भारत आणि ऑस्ट्रेलियामधील त्यांचे द्वंद्वयुद्ध दिग्गजांचे होते. १९९८ मध्ये, जेव्हा ऑसीज भारतीय भूमीवर कसोटी मालिका खेळण्यासाठी उतरले होते, तेव्हा ते भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचे राहिले नव्हते, सर्वांनी त्याला वॉर्न विरुद्ध तेंडुलकर असे नाव दिले.

सचिन तेंडुलकरने (sachin tenulkar) वॉर्नच्या (shane warne) जादूगिरीला ओळखले होते. याबाबचा एक किस्सा सचिनचे माजी कोच बलविंदर सिंग संधू (balvindar singh sandhu) यांनी सांगितला आहे. कसोटी मालिका सुरु होण्याआधी वॉर्नने मुंबईच्या प्रथम श्रेणी संघासोबत सामना खेळला. “सचिनच्या मनात एक प्लॅन होता आणि त्याने सर्व खेळाडूंना वॉर्नवर हल्ला करण्यास सांगितले. भारतीय विकेट्सवर, वॉर्न हा एकमेव ऑसी गोलंदाज होता, जो फलंदाजांना अडचणीत आणू शकला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध बचावात्मक होण्याऐवजी, सचिनने सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला आणि आक्रमक पद्धतीने खेळण्यास सांगितले.”

संधू पुढे म्हणाले “वॉर्नवर हल्ला करण्याची योजना चांगली ठरली कारण त्याचा फायदा केवळ मुंबई संघालाच नाही तर भारतीय संघालाही झाला. टीम इंडियाच्या वरिष्ठ फलंदाजांसाठी हा संदेश स्पष्ट होता की, जर तुम्ही वॉर्नवर हल्ला केला तर तुम्ही त्याला तुमच्यावर वर्चस्व गाजवण्यापासून रोखू शकता. टीम इंडियाने कसोटी मालिकेत विजय मिळवण्याचे हे मोठे कारण ठरले.”

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!