चेन्नई : मगंळवारी झालेल्या आयपीएलच्या अंत्यत चुरशीच्या सामन्यात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने विजयाची गुढी उभारत कोलकाता नाइट रायडर्सचा १० धावांनी पराभव केला आहे. या विजयासोबत मुंबईने या मोसमातील आपल्या पहिल्याच विजयाची नोंद केली आहे. तसेच कोलकाताविरुद्ध विजयाची पंरपरा कायम ठेवली आहे.
या सामन्यात आखेरच्या षटकात रोहित शर्माने केलेल्या गोलंदाजीत बदलामुळे त्याच्या नेतृत्वाचे चांगलेच कौतुक होत आहे. या दरम्यान होम डिलीव्हरी द्वारे खाद्पदार्थ पोचवणारी स्विगी कंपनीने रोहित शर्माचा एक वादग्रस्त फोटो ट्विट करत रोहित शर्मावर कमेंट केली होती. ही कमेंट त्याना चांगलीच महागात पडली. या ट्विटनंतर रोहितच्या चाहत्यांनी ट्विटरवर ‘बायकॉट स्विगी’ हा ट्रेंड सुरु केला. आम्ही तो फोटो स्वत: तयार केला नव्हता, परंतु आम्ही मान्य करतो की आम्ही काही यापेक्षा वेगळी भाषा वापरायला हवी होती. आम्हाला कोणालाही दुखवायचे नव्हते.’ असे म्हणत माफी मागत ते ट्विट हटवले.

कोलकाता-मुंबई संघादरम्यान होण्याऱ्या सामन्याअगोदर ब्लेड रनर नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने रोहित शर्माचा फोटोशॉप केलेले एक मीम शेअर केले होते. या फोटोशॉप केलेल्या मीममध्ये रोहित वडापावच्या गाडीवर झेपावलेला दिसत आहे. एकप्रकारे अशा प्रकारची टीका रोहित शर्माच्या तंदुरुस्तीला उद्देशून झाली आहे. या ट्विटवर स्विगीनेही प्रतिक्रिया देत लिहिले की, द्वेष करणारे म्हणतील की हा फोटो फोटोशॉप केलेला आहे.
महत्वाच्या बातम्या
- माजलगावात आगीचे तांडव; लाखोंचे नुकसान
- सरकारकडून कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या आकडेवारीची लपवाछपवी, सोमय्यांनी केला भांडाफोड
- लॉकडाऊनची मुदत वाढविण्याची वेळ आणू नका, पालकमंत्री अमित देशमुख यांचे आवाहन
- जेव्हा खासदार मुंडे डॉक्टर म्हणून रुग्णालयात जातात!
- ‘फक्त उत्सवाचा देखावा, राहुल गांधींचा पीएम केअरवर सवाल


